वैद्यकीय सेवा
रक्तदान शिबीर

वैद्यकीय सेवा अर्थात प्रथमोपचार केंद्र गेली दहा वर्षे सातत्याने कायमस्वरूपी चालू असून त्यामध्ये १ डॉक्टर व १ कंपौंडर यांची सोय केली आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे ६५,००० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेमार्फत औषधे ,गोळ्या ,इंजेकशन तपासणी दररोज केली जाते.

महोत्सवाच्या कालावधीत रक्तदान  शिबिराचे आयोजन केले जाते.

शैक्षणिक कार्य
Educational Programmes

संस्थानने सन १९८५ पासून शैक्षणिक जिल्हास्तरीय कार्याला सुरवात करून दरवर्षी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग तसेच जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा राबविले जातात.

या शैक्षणिक सेवेचा हजारो विद्याथ्री लाभ घेत आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम
Cultural Programmes

सध्याच्या काळातील धकाधकीच्या जीवनात धार्मिकतेची जोड सर्वाना आवश्यक आहे जिल्ह्यातील भजन मंडळांना एकत्र करून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा तसेच कीर्तन महोत्सव,भावगीते,भक्तिगीते,अभंगवाणी त्याचप्रमाणे कोकणचा पारंपरिक दशावतार असे सांस्कृतिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात.